कोल्हापुरातून ५५ हजार लोक झाले रवाना

Migrant worker 55000m Leave Kolhaur

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले अन्य राज्यांतील ४० हजार तर महाराष्ट्रातील १५ हजार असे मिळून ५५ हजार नागरिक आज अखेर त्यांच्या गावांना रवाना झाले.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये परराज्यातील सुमारे ४० हजार १३७ स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरू, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले होते. यामध्ये उत्तरप्रदेशमधील १५,२२२, बिहारमधील ११,००४, मध्यप्रदेशमधील २५९०, झारखंडमधील २१३१, छत्तीसगडमधील ४२, राजस्थानमधील २५३०, गुजरातमधील ११५, गोव्यामधील ३३७, कर्नाटकमधील ३३९४, आंध्रप्रदेशमधील ४४, तेलंगणामधील ६८, केरळमधील ३६, तामिळनाडूमधील ३३५, ओरिसामधील ७०६, पश्चिम बंगालमधील २१८, दिल्लीमधील ९, पूर्वेकडील राज्यातील १९३ आणि इतर १६३ जण रवाना झाले आहेत.

ही बातमी पण वाचा :कोल्हापुरात 20 हजार लोक क्वारंटाईन

महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील १५ हजार २६४ जण लॉकडाऊनमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अडकले होते. यामध्ये मुंबई शहरातील १०१, मुंबई उपनगर १६, ठाणे जिल्ह्यामधील ५२०, पालघरमधील ७२, रायगडमधील १४९, रत्नागिरीमधील ४५५, सिंधुदुर्गमधील ४५६, सातारामधील ६४५, सांगलीमधील १७४६, सोलापूरमधील २२१९, पुण्यामधील २१७५, नाशिकमधील १९४, धुळेमधील १७७, जळगावमधील १५५, नंदुरबारमधील १२३, अहमदनगरमधील १०३०, औरंगाबादमधील १०२, बीड २२९, जालनामधील ४४, उस्मानाबादमधील ६३२, लातुरमधील ८८९, नांदेडमधील २५८, परभणीमधील १८५, हिंगोली ४९, अमरावती ३६, अकोलामधील ५८, बुलढाणामधील ६६, यवतमाळमधील १५६, वाशिम ८०, नागपूरमधील ५७, भंडारामधील १०, वर्धा जिल्ह्यातील १२, गडचिरोलीतील १३, चंद्रपूरमधील ५२ आणि गोंदियामधील १०४ जण रवाना झाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER