जिल्ह्यातील पाच तालुक्यात 53 हजार 413 घ.मी पाणी उपलब्ध

watar

ठाणे :- ठाणे जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ही योजना ठाणे जिल्ह्यातील ग्रमाण भागासाठी वरदायीनी ठरत आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 12 गावांमध्ये राबविण्यात आलेल्या या योजनेमुळे 53 हजार 413 घ.मी इतका गाळ काढण्यात आल्यामुळे तितक्याच प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आली.

पंचायत समितीचा अधिकार वाढवणार : हसन मुश्रीफ

ठाणे जिल्हा हा धारणांनाच जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. असे असताना, देखील वर्षांनुवर्षे पाणी टंचाई आणि नापिकीच्या झळा शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाव पांड्याना सोसाव्या लागत होत्या. या परिसरात उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र, टँकरने करण्यात असलेला पाणी पुरवठादेखील पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे या गावाची पाण्याची तहान देखील भागात नव्हती. त्याचा परिणाम ग्रामीन भागातील जनतेच्या रोजगारावर देखील होत होता. ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यातील पाच तालुक्यात ग्रामीण भागात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यात ही योजना कृषी विभाग, वन विभाग, लघु पाटबंधारेविभाग (जी.प), लघु सिंचन जलसंधारण, भूजल सर्वेक्षण आणि ग्रामीण पाणी पुरवठा आदी विभागांमार्फत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 12 गावांमध्ये यंदाच्यावर्षी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना ठाणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात आली. या योजनेतंर्गत 12 गावांमधील गावतलाव, बंधारे, नाला आदी विविध ठिकाणाहून 53 हजार 413 घ.मी. इतक गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे तितक्याच प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. दरम्यान, उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्यामुळे विहीरींच्या पाणी पातळीत वाढ, सिंचन क्षेत्रात वाढ होणे, हातपंप, कुंपनलिका, कपडे धुन्यासह दैनंदिन कामांसाठी वापर होत आहे. पाणी जमिनीत जिरून भूगर्भातील पाण्याची पातळीवर येण्यास मदत झाली असूनजनावरांनाही तसेच जंगलातील पशुपक्षांना देखीलवनराईबंधार्‍यामुळे पाणी उपलब्ध झाले असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक इंदूरकर यांनी दिली.