परभणी जिल्‍हयात ५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात

एकुण २८ उमेदवारांची माघार

परभणी : परभणी जिल्‍ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकुण ८१ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.

यामध्‍ये ९५-जिंतूर- एकुण १७ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी माघार घेतली असून १३ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. ९६-परभणी – मतदारसंघातील एकुण २७ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांनी माघार घेतली असून १५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

९७-गंगाखेड- मतदारसंघातील एकुण २३ उमेदवारांपैकी ८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून एकुण १५ उमेदवार निवडणूकलढविणार आहेत. ९८- पाथरी- मतदारसंघातील एकुण १४ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी माघार घेतली असून एकुण १० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. जिल्‍ह्यातील ४ मतदारसंघात एकुण ८१ पैकी ५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.