गोवा : इफ्फीचा पडदा ‘अनादर राउंड’ ने उघडणार

51st Indian International Film Festival

पणजी : गोव्यात १६ ते २४ जानेवारी दरम्यान ५१वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (51st Indian International Film Festival) (इफ्फी) होत आहे. महोत्सवाचा पडदा थॉमस विंटरबर्ग यांच्या ‘अनादर राउंड’ या चित्रपटाने उघडणार आहे. तर कियोशी कुरोसावा यांचा ‘वाइफ ऑफ ए स्पाय’ (wife-of-a-spy) या जपानी चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

‘अनादर राउंड’ हा डॅनिश व स्वीडिश भाषेतील चित्रपट असून तो १ तास ५७ मिनिटांचा आहे. हा चित्रपट डेन्मार्कची ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री होती. १६ जानेवारी रोजी इफ्फी मध्ये ‘अनादर राउंड’चा इंडियन प्रिमियर होईल. तर ‘वाइफ ऑफ ए स्पाय’ या चित्रपटाचा इंडियन प्रिमियर २४ जानेवारी रोजी इफ्फी त होईल.

‘इफ्फी’मध्ये ऑस्ट्रीया येथील संदिप कुमार यांचा ‘मेहरूनिसा’ या चित्रपटाचे देखील वर्ल्ड प्रिमियर होणार आहे. फारूख जाफर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. महिलेच्या आयुष्यभराच्या स्वप्नांना पंख देणारा हा चित्रपट आहे. दरम्यान, ५१व्या इफ्फी मध्ये विविध विभागातून एकूण २२४ चित्रपट पहायला मिळतील. यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महोत्सव हायब्रिड पध्दतीने होणार आहे. त्यामुळे सिनेप्रेमींना महोत्सवातील चित्रपट ऑनलाईन पहायला मिळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER