शेतक-याच्या कुटुंबियांना 51 लाखाची भरपाई

मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचा आदेश : दावा दाखल केल्यापासून 9 टक्के व्याज द्यावे लागणार

8 lakh cash seized in Dharavi

पुणे (प्रतिनिधी) : अपघातात मृत्यू झालेल्या शेतक-याच्या कुटुंबियाना 50 लाख 93 हजार 668 रुपये देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य पी.आर. अष्टुरकर यांनी दिला आहे. त्यावर दावा दाखल केलेल्या तारखेपासून वार्षिक 9 टक्के दराने व्याज देण्यात यावे, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. व्याजासह ही रक्कम 67 लाखापर्यंत पोहोचते.

त्या शेतक-याच्या सहा वारसांनी अ‍ॅड. अनिल पटनी आणि अ‍ॅड. आशिष पटनी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. मयत शेतकरी हे 24 आॅगस्ट 2015 कुटुंबियांसाह आळंदी येथून निमगाळ म्हाळुंगेकडे कारमधून चालले होते. चालक गाडी चालवित होता. चालकाच्या बाजूला ते पुढे बसले होते. त्याचवेळी एक ट्रक समोरून येत होता. त्या ट्रकच्या केबिनच्या वरती लोखंडी रॉड ठेवले होते. तो ट्रक कारजवळ आला. त्याचवेळी कॅबिनवरील रॉड कारवर पडला. काचेतून आत घुसून पुढे बसलेल्या शेतक-याला घुसला. त्यात गंभीर जखमी होऊन त्या शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ते 55 वर्षांचे होते. ते शेतकरी असून, वडिलांच्या नावे असलेल्या शेतीतून त्यांना उत्पन्न मिळत होते. दुध आणि ऊसापासून गुळ बनविण्याचा त्यांचा व्यवसाय होता. दररोज 180 लीटर दुध डेअरीला घालत होते. या पार्श्वभूमीवर 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, असा दावा अ‍ॅड. अनिल पटनी आणि अ‍ॅड. आशिष पटनी यांनी दाखल केला होता.

त्यांचे उत्पन्न सिध्द करण्यासाठी अ‍ॅड. अनिल पटनी यांनी सहा साक्षीदार तपासले. मयत दरमहा 48 हजार 455 रुपये कमवित असल्याचे सिध्द केले. तर, शेती नावावर नसल्याने उत्पन्न नाकारावे, तसेच दुध व्यवसायातून एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत नसल्याचे विमा कंपनीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. मात्र, न्यायालयाने अ‍ॅड. पटनी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत वरील आदेश दिला आहे.