कोरोनाच्या संकटात १८ डॉक्टर शहीद तर १२०० हून जास्त जणांना कोरोनाची लागण

India-Coronavirus

मुंबई : देशात कोरोना व्हायरसचे थैमान आहे. या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावणारे डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे .

१ जुलै हा ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जात असून जगभरातील डॉक्टरांना यंदाचा ‘डॉक्टर्स डे’ करोनामुळे कायम लक्षात राहील. करोनाच्या लढाईत महाराष्ट्रात देवरुपी तब्बल १८ डॉक्टर रुग्णसेवा करताना शहीद झाले तर १२०० हून अधिक डॉक्टरांना करोनाबाधित झाले होते. याशिवाय जवळपास दोन हजारच्या आसपास डॉक्टरांना क्वारंटाइन व्हावे लागले.

एकट्या महाराष्ट्रात आज १ लाख ७० हजार रुग्ण करोनाबाधित आहेत तर ७६१० हून अधिक करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या या लढाईत जमेची बाजू म्हणजे जवळपास नव्वद हजार रुग्ण म्हणजे ५२ टक्के रुग्ण बरेही झाले आहेत. यामागे डॉक्टरांचे अथक परिश्रम कारणीभूत असून यंदाचा ‘डॉक्टर्स डे’ हा केवळ डॉक्टरांच्याच नव्हे तर प्रत्येकाच्या कायम लक्षात राहील”, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

दरम्यान देशात मागील २४ तासांत तब्बल १८ हजार ६५३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ५०७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER