कोल्हापुरात मास्क न वापरण्यावर ५ हजार दंड : आजपासून सुरुवात

No Mask Fine 5000 Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने कंटेन्मेंट झोनमधील नियम मोडणाऱ्यांवर 5 हजार दंड (5000 Fine) करणार असल्याचे यापूर्वीच घोषित केले आहे. आता मास्क (Mask, ) न वापरणारे, सोशल डिस्टन्स (Social Distancing) न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

कोल्हापूर महापालिका (Kolhapur Mahapalika) कर्मचाऱ्यांकडूनही दंडात्मक कारवाई केली जात होती. परंतु, यानंतरही याचे उल्लंघन होत असल्याने आता पोलिस दलाची मदत घेतली जाणार आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबतच आता पोलिसही कारवाईत सहभागी होणार आहेत. रविवारपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, गडहिंग्लज, कागल, जयसिंगपूर, वडगाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळून आले आहेत. महापालिका, नगरपालिकेचे कर्मचारी यापूर्वी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करत होते. परंतु, त्यांच्यासोबत उद्धट वर्तन करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत होते. यामुळे महापालिका आयुक्तांनी पोलिस बंदोबस्ताची मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली होती. यानुसार बंदोबस्त पुरविला जाणार असल्याचे डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER