‘ते’ दुखणे दूर करण्यासाठी ५ हजार कोटींची मदत द्यावे; अजित पवारांची पंतप्रधानांची मागणी

Pm Modi - Ajit Pawar - Maharashtra Today

नवी दिल्ली :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यात बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. जवळपास दोन तास ही भेट चालली. मराठा आरक्षणाचा प्रश्न, ओबीसी आरक्षण, जीएसटी, मेट्रो कारशेड, राज्यपाल नियुक्त, विधान परिषदेच्या जागा अशा १२ विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मोदींच्या भेटीनंतर दिल्लीतील महाराष्ट्र भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी मुद्दे मांडले.

अजित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात आम्ही मोदींकडे विविध मुद्दे मांडले आहे. यामध्ये मराठा आरक्षण, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण, याचा परिणाम शंभरपेक्षा अधिक जागांवर झाल्याचे सांगितले आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत‌ चर्चा झाली, कारण २०२१च्या जनगणेने हा मुद्दा निकालात येऊ शकेल, इतर राज्यातही याचा परिणाम झाल्याचे सांगितले आहे.”

कांजूरमार्ग मेंट्रो कारशेडचा मुद्दाही चर्चेत मांडला. गेल्या काही वर्षात‌ ४ चक्रीवादळे आली. त्यावर पक्के काहीतरी करण्याची गरज‌ आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस मदत करताना केंद्राने काही निकष बदलायला हवेत २०१५ चे निकष आता २०२१ ला वापरून चालणार नाहीत, असेही आम्ही पंतप्रधानांना सांगितले.

कायमचे दुखणे दूर करण्यासाठी ५ हजार द्या

महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षात चार चक्रीवादळे आली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई या समुद्रकिनाऱ्यासाठी काही गोष्टी पर्मनंट झाल्या पाहिजे. उदा; अंडरग्राऊंड केबल, विद्युत वाहिनी टाकणे, पक्के निवारे, किनारा संरक्षण भिंत उभे करणे अशा गोष्टी आहेत, या सगळ्या पायाभूत सुविधांसाठी ५ हजार कोटींची आवश्यकता आहे. NDRF चे पैसे, काही राज्य सरकारचे पैसे हे कायमचे दुखणे दूर करण्यासाठी आम्ही आराखडा बनवला आहे. त्यासाठी ५ हजार कोटी रुपयाची मदत द्यावी, अशी मागणी केल्याचे अजित पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचे होते का? निलेश राणेंचा सवाल 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button