सरकारी रुग्णवाहिकेला रोज ५० लिटर डिझेल मोफत; अंबानींची मोठी घोषणा

Mukesh Ambani - Maharashtra Today

मुंबई :- देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दरदिवशी चार लाखांहून अधिक नव्या कोरोना (Corona) रुग्णांची नोंद झाली. मात्र, हा आकडा तीन लाखांच्या आत उतरला आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) मदतीला पुढे आले आहेत. कोरोनाकाळात रिलायन्स समूहाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता रिलायन्स समूहाच्या मालकीच्या रिलायन्सच्या पेट्रोल पंपांवर रुग्णवाहिकांना रोज ५० लिटर डिझेल मोफत देणार आहे.

मात्र यासाठी एक अट आहे. मोफत डिझेल घेणारी रुग्णवाहिका सरकारी असायला हवी. देशभरात रिलायन्सचे जवळपास १ हजार ५०० पेट्रोल पंप आहेत. या सर्व पेट्रोल पंपवर ही सुविधा उपलब्ध असणार आहे. रिलायन्सच्या सर्व पेट्रोल पंपांवर सरकारी रुग्णवाहिकांना ३० जूनपर्यंत मोफत डिझेल मिळणार आहे. गेल्या काही दिवसांत इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे कोरोना संकटात सुरू असलेल्या मदतकार्यात कोणतीही अडचण न येण्यासाठी रिलायन्सने हा निर्णय घेतला आहे. या काळात केंद्राने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. या महामारीशी दोन हात करण्यासाठी रुग्णवाहिकांना आम्ही मोफत ‘डिझेल’ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारी खर्च वाचेल. पैशांची बचत होईल, असे रिलायन्सने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button