पाकिस्तानात रेल्वेचा भीषण अफघात, ५० जणांचा मृत्यू

Pakistan train accident

इस्लामाबाद : पाकिस्तानात (Pakistan) आज सकाळी भीषण रेल्वे दुर्घटना घडली. दोन रेल्वे गाड्यांची समोरासमोर धडक (train accident) झाल्याने तब्बल ५० प्रवाशांचा मृत्यू (50 killed) झाला. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.पाकिस्तानातील घोटकीमध्ये रेती आणि डहारकी रेल्वे स्थानकां दरम्यान दोन एक्सप्रेस एकमेकांवर धडकल्या आणि भीषण अपघात झाला. पाकिस्तानच्या स्थानिक न्यूज चॅनलनं दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झालं असून मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. पाकिस्तानातील रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिल्लत एक्स्प्रेस अनियंत्रित झाल्याने तिचे डबे दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर गेले. त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरुन सय्यद एक्स्प्रेस जात होती. त्यावेळी ही भीषण धडक झाली. या अपघातात मिल्लत एक्स्प्रेसचे ८ आणि सय्यद एक्स्प्रेसच्या इंजिनसह चार डबे ट्रॅकवरुन उतरले. घोटकीच्या डीसी उस्मान अब्दुल्ला यांनी सांगितलं की, आतापर्यंत या अपघातात ५०लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन्ही ट्रेन्सच्या डब्ब्यांमध्ये अनेक प्रवासी अडकलेले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झालं असून घटनास्थळी पाकिस्तान रेंजर्स सिंधचे सैनिकही पोहोचले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button