रोज ५० जीबी डेटा! जिओच्या ‘वर्क फ्रॉम होम’ला आव्हान

Airtel -Jio-Work From Home

एअरटेलने इंटरनेटचा रोज ५० जीबी डेटाचा खास प्लॅन आणला आहे. यामुळे जिओच्या ‘वर्क  फ्रॉम  होम’ प्लॅनला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक लोक घरून काम (work from home) करत आहेत. त्यांनाइंटरनेटची कमी जीबीची सेवा पुरत नाही. शिवाय लॉकडाऊनमुळे घरात अडकलेले लोकही वेळ घालवण्यासाठी इंटरनेट वापरतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. एअरटेलच्या या नव्या डेटा व्हाऊचरची किंमत २५१ रुपये आहे.

यामध्ये अनलिमिटेड ५० जीबी डेटा वापरता येणार आहे. पॅकच्या वैधतेनुसार ग्राहकांना एका दिवसात डेटा संपवायचा आहे. हे फक्त डेटासाठी व्हाऊचर असल्यामुळे यासोबत एसएमएस किंवा निःशुल्क कॉलिंग नाही. डेटाची वाढती मागणी आणि प्रसिद्धी पाहून एअरटेलने आपल्या ९८ रुपयांच्या डेटा व्हाऊचर प्लॅनमध्येही दिला जाणारा डेटा डबल केला आहे. सुरुवातीला ९८ रुपयांत सहा जीबी डेटा मिळत होता.

आता १२ जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय एअरटेलने ग्राहकांसाठी ४०१ रुपयांचा प्लॅन आणला आहे. यात २८ दिवसांच्या वैधतेसह रोज तीन जीबी डेटा मिळणार आहे. यासोबत DisneyHotstar VIPचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. एअरटेल ते इतर नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉल आणि रोज १०० एसएमएस मिळणार आहेत. यामध्ये ५५८ रुपयांचा ५६ दिवसांसाठी आणखी एक प्लॅन आहे. त्यामध्ये तीन जीबी डेटा, १०० एसएमएस दरदिवशी सोबत अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला