वडापाव विकून बनवली ५० कोटींची कंपनी !

50 crore company formed by selling Vadapav!

मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. या शहराचं नांव घेतलं कि अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेली मुंबई एका खाद्यपरथासाठीही ओळखली जाते. वडापाव (Vadapav) ! अनेक प्रकारचे वडापाव तुम्ही खाल्ले असतील पण तुम्ही एखाद्या वडापाव वाल्याला करोडोंचा कारभार करताना पाहिलंय का ? किंवा अशा वडापाव वाल्याबद्दल ऐकलंय का ज्याच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल हार्वर्ड बिजनेस स्कुल संशोधन (Harvard Business School Research) केलं जातंय ? नाही ना ? त्याबद्दलच आज जाणून घेऊ.

मुंबईच्या गोली वडापाव कंपनीचे (Goli Vadapav Company) संस्थापक व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांनी २००४ मध्ये मुंबईच्या प्रसिद्ध वडापावची कंपनी सुरु केली. आज या कंपनीच्या ३५० शाखा आहेत.

व्यंकटेश म्हणतात कि, “जर तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं नाही तर तुम्हाला वडापाव विकावा लागेल असं पालक सर्रास आपल्या मुलांना म्हणतात. माझ्या पालकांनाही इतर पालकांप्रमाणेच आपला मुलगा डॉक्टर, इंजिनियर व्हावा असं वाटायचं. पण घरच्या लोकांनीं कधीच विचार केला नसेल कि मी वडापाव विकून एवढं यश मिळवू शकतो.”

स्वतःच्या एवढा यशस्वी उद्योग सुरु कारण्यापूर्वी व्यकंटेश यांनी प्रचंड संघर्ष केला. ते जवळपास पंधरा वर्ष फायनान्स सेक्टर मध्ये काम करत होते. रिटेल सेक्टरमध्ये काम करून ते क्षेत्र मजबूत करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु होता. गरजवंत लोकांना इथे अधिकाधिक नोकऱ्या उपलब्ध व्हाव्या यासाठीही ते प्रयत्न करत होते.

२००४ मध्ये गोली वडापावचं पाहिलं स्टोअर त्यांनी कल्याणमध्ये सुरु केलं.

जेव्हा व्यंकटेश यांनी वडापावचं दुकान सुरु करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक मित्रांनी मुंबईच्या स्टाईल मध्ये “क्या गोल दे राहा है ?” असं विचारलं. तेव्हापासून त्यांच्या डोक्यात हा शब्द फिरत होता. दुकानाला नाव देण्याच्या वेळी त्यांनी ह्याच शब्दाचा विचार करून आपल्या वडापाव स्टोअरला “गोली वडापाव” असं नाव दिलं.

वडापाव लोकांना आकर्षित करणारं नाव आहे म्हणून स्टोअरचं नाव :गोली वडापाव’ आहे पण इथे पनीर वडापाव, शेज़वान, मिक्स वेज, पालक मकई, पनीर वडा असे पदार्थही मिळतात.

गोली वडापावच्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीची जगभर चर्चा आहे. यासाठी ते नवनवे मार्ग अवलंबवत असतात. आपल्या नावाच्या ब्रॅण्डिंग साठी त्यांनी बऱ्याच बस स्टॉपला गोली वडापाव नाव दिलंय. आज जगभरात ८ पुरवठा केंद्र आणि २० हजार ग्राहक असलेली कंपनी दिवसेंदिवस प्रगती करताना दिसते.

या कामासोबतच व्यंकटेश शिक्षण न घेऊ शकणाऱ्या मुलांसाठीही काम करत आहेत. दहावीनंतर शिक्षण घेऊ न शिकलेल्या मुलांना ते आपल्या कंपनीत काम कारण्याची संधी  देतात. यातून समाजाप्रती असलेली त्यांची आपुलकीची भावनाही दिसून येते.

व्यंकटेश आपल्या कामाबद्दल सांगताना नेहमी थ्री ई बद्दल सांगत असतात. ते थ्री ई आहेत एज्युकेशन, एम्प्लॉयमेन्ट आणि एंटरप्रेन्योरशिप (शिक्षण, रोजगार आणि व्यवसाय ) या गोष्टी खूप महत्वाच्या असल्याचं व्यंकटेश अय्यर नेहमी सांगत असतात. व्यंकटेश अय्यर यांच्यावर इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्तींचा प्रभाव आहे.

त्यांच्या या यशस्वी कंपनीचा कारभार जवळपास ५० कोटी रुपयांचा आहे. त्यांच्या बिझनेसवर हार्वर्ड बिजनेस स्कूल, आईएमडी स्विट्ज़रलैंड आणि आईएसबी हैदराबाद सारख्या अनेक संस्था संशोधन करीत आहेत.

गोली वडापावच्या माध्यमातून वडापावला जगाच्या कानाकोपऱ्यात  घेऊन जायची व्यंकटेश यांची इच्छा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER