५ वर्षांची ममता ४ तास अडकली होती पुराच्या धारेत

Mamta Vijay Lilka

पालघर : मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यात काल रात्री शेणसरी इथे पूर आला. रात्री २ वाजताच्या सुमाराला ममता विजय लिलका ही ५ वर्षांची बालिका पुरात वाहून गेली. सुदैवाने एका झाडाची फांदी तिला लागली, तिने ती पकडून ठेवली. पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिलकापाडा येथे राहणाऱ्या विजय लिलका कुटुंबीयांसह शेतातील घरात असताना नदीला पूर आला.

५ ऑगस्टला रात्री  २ वाजता डोंगरावरून आलेल्या पाण्याचा लोंढा आणि पुराच्या पाण्यात विजय लिलका यांची पाच वर्षांची मुलगी ममता वाहून गेली. या घटनेची माहिती कासा पोलिसांना पहाटे ३ वाजता मिळाली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. ममता जिथून वाहून गेली होती त्या जागेपासून ४०० ते ५०० मीटर दूरपर्यंत शोध घेणे सुरू असताना पोलिसांना ममताच्या रडण्याचा आवाज आला. पहाटे ६.३० च्या सुमारास ती पुराने वेढलेल्या एका झाडावर अडकलेली दिसली.

पोलीस दलाच्या स.पो.नि.सिद्धवा जायभाये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ममताला पुरातून बाहेर काढले. तिच्यावर सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी ममताच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली व सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. पालघर पोलिसांनी ममताचे प्राण वाचविण्यासाठी केलेल्या कर्तबगारीचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विट करून पोलिसांचे अभिनंदन आणि कौतुक केले.

पोलिसांनी वाचवले २२ जणांचे प्राण पालघर जिल्ह्यात पुरात अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील एकूण सहा पोलीस ठाण्याअंतर्गत शोध आणि बचाव मोहीम हाती घेण्यात आली होती. पालघर पोलीस दलाने एकूण २२ जणांचे प्राण वाचवले.

 ही बातमी पण वाचा : एवढा पाऊस पडल्यावरजगातील कोणतंही शहर तुंबणारच; मनपा आयुक्तांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER