नागपुरात पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून; आरोपीला अटक

5-year-old-girl-was-allegedly-killed-after-a-rape in nagpur

नागपूर :- हैदराबाद आणि उन्नाव बलात्कारप्रकरणाची घटना ताजी असतानाच नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत एका चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीे. कळमेश्वर पोलीस स्टेशनपासून १५ किलोमीटरवरील लिंगा येथील संजय भारती रा. नागपूर यांच्या शेतात या बालिकेचा (वय पाच ) मृतदेह सापडल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास करून हे विकृत कृत्य करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे.

संजय पुरी (३२ ) असे या नराधमाचे नाव आहे. तो शेतमजुरी करतो. दारू पिऊन त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी संजय पुरी विरोधात खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी दोन जणांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या बालवाडीत शिकणारी ही मुलगी गुरुवारपासून बेपत्ता होती.

तेव्हापासून पोलिसांकडून या मुलीचा शोध सुरू होता. अखेर पोलिसांना काल सकाळी ११ वाजता लिंगा परिसरातील शेतात या मुलीचा मृतेदह आढळून आला. तिच्या तोंडात कापड व काड्या कोंबण्यात आल्या होत्या. तसेच दगडाने ठेचण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.