कोकणात जाण्यासाठी 5 हजारांची ई-पाससाठी लूट : नितेश राणेंचे शिवसेनेवर आरोप

Nitesh Rane & Shivsena

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली . मात्र आता लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहे . राज्य सरकारने इतर जिल्ह्यात जाण्यास परवानगी दिल्यामुळे अनेक चाकरमानी कोकणाकडे निघाले आहे. जिल्हाबंदी असल्यामुळे ई-पास काढणे बंधनकारक आहे. परंतु, काही दलालांकडून ई-पाससाठी प्रत्येकी 5 हजार रुपये उकळले जात आहे, असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी ई-पाससाठी एका महिलेसोबत मोबाईल संवादाचे ऑडिओ ट्वीट केले आहे. यामध्ये ही महिला ई-पास काढून देण्याची हमी देत आहे. आधार कार्ड, गाडीचा नंबर घेऊन ही महिला अवघ्या 3 तासात ई-पास काढून देते असल्याचे सांगत आहे. या पाससाठी प्रत्येकी 5 हजार रुपये दर मोजावा लागत आहे.

ज्या कोकणातल्या जनतेनं शिवसेनेला सगळं काही दिले त्या जनतेला सरकारकडूनच लुटले जात आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला. या एजंटला कोणाची मदत आणि आशीर्वाद आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही राणे यांनी केली.

विशेष म्हणजे, राज्य सरकारकडून ई-पास देण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातूनच ई-पास दिले जात आहे. असं असतानाही पैसे देऊन पास देण्याचा प्रकार घडत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER