राज्यात दिवसभरात ५ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त

Corona Virus

मुंबई : महाराष्ट्रात दिवसभरात ५ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण १७ लाख ४२ हजार १९१ कोरोना (Corona) बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४५ टक्के इतका झाला आहे. आज राज्यात ४ हजार ९८१ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात दिवसभरात ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.५७ टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १४ लाख ४७ हजार ७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ६४ हजार ३४८ नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४३ हजार ९१ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. ५ हजार १०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आजघडीला ७३ हजार १६६ रुग्ण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ४ हजार ९८१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ६४ हजार ३४८ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ७५ मृत्यूंपैकी ६३ मृत्यू हे मागील ४८ तासातले आहेत. तर १२ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत, असंही आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.

Check PDF :-प्रेस नोट ९ डिसेंबर २०२०

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER