गडचिरोली कोब्रामेंढा जंगलातील चकमकीत पाच नक्षलवादी ठार !

5 Naxalites killed in Gadchiroli Cobramendha forest encounter

गडचिरोली : पोलीस उपविभाग कुरखेडा (Police Sub-Division Kurkheda) अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात आज सकाळी ७.३० ते ८ या वेळेत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी या घटनेला दुजोरा दिला.

ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये (5 Naxalites killed) तीन पुरुष व दोन महिला असल्याची माहिती पाटील यांनी दिली. शनिवारपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत दोन चकमकी झाल्या. शनिवारी जवळपास दीड तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून, नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. या चकमकीनंतर घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

तीन ठिकाणी चकमक
खोब्रामेंढा हेटाळकसा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत आहे. शनिवार २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता जंगलात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांना ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. यावेळी सुमारे ६० ते ७० मिनिटे चाललेल्या चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा झाला, यात तीन पुरुष आणि दोन महिला नक्षल्यांचा समावेश आहे. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अधिकृत माहिती दिली जाईल, असे संदीप पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button