
रत्नागिरी : मिरज येथून नुकत्याच प्राप्त झालेल्या १० रुग्णांच्या अहवालामधील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील एक पॉझिटिव्ह आहे. रत्नागिरी तालुक्यातील रुग्ण सध्या जिल्हा रुग्णालयात दाखल असून तो तालुक्यातील देऊळ चिखलगाव जाकादेवी या भागातील आहे. गुहागर तालुक्यातील 9 पैकी 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील दोन जण स्थानिक असून त्यांना मुंबईतून आलेल्या रुग्णांमुळे संक्रमण झाले आहे. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 161 इतकी झाली आहे. तर यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 102 इतकी झाली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला