अयोध्या ५ लाख ८४ हजार ५७२ दिव्यांनी झगमगली, दीपोत्सव गिनीज बुकात !

Ayodhya - Diwali

अयोध्या : दिवाळीनिमित्त (Diwali) ५ लाख ८४ हजार ५७४ दिव्यांनी प्रभू रामचंद्रांची (Lord Ram) अयोध्या उजळून निघाली. एवढ्या मोठ्या संख्येत पणत्या लावण्याच्या या विक्रमाची गिनीजबुकात नोंद झाली आहे.

प्रभू रामचंद्रांची दिव्यांनी उजळलेली अयोध्या आणि डोळ्याचं पारणं फेडणारा हा उत्सव पाहून भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. आपण सगळ्यांनी करोनाच्या (Corona) गाइडलाइन पाळून दीपोत्सव साजरा केला आहे. आता प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारतानाही ‘दो गज की दूरी मास्क है जरुरी’ हा मंत्र पाळू असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला दिवा लावून या दीपोत्सवाचा प्रारंभ केला. शरयू नदीच्या काठावर ५ लाख ८४ हजार ५७४ दिवे लावण्यात आले. एवढ्या पणत्या लावून दिवाळी साजरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

काही महिन्यांपूर्वीच राम मंदिराच भूमिपूजन झाले आहे; या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या दिवाळीला विशेष महत्त्व आहे. त्याच निमित्त आज अयोध्येत ५ लाख ८४ हजारांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करण्यात आले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER