५ लाख १३ हजार ‘लाइक’! मोदींनी लॉकडाऊनमध्ये केलेल्या ट्वीटने केला विक्रम

PM Narendra Modi

नवी दिल्ली : कोरोना काळात (Coronavirus) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) यांनी केलेले एक ट्विट भारतात रिट्वीट करण्यात आलेले पहिल्या क्रमांकाचे राजकीय ट्वीट आहे. पीएम मोदींचे हे ट्वीट १ लाख १८ हजार वेळा रिट्वीट करण्यात आले आहे व याला ५ लाख १३हजार ‘लाइक’ मिळाले!

यामुळे राजकीय नेत्याचे सर्वाधिक रिट्वीट झालेलं ट्वीट मोदींच्या नावे आहे. मोदी यांनी देशवासियांना लॉकडाऊन काळात दीप प्रज्वलन करण्याचं आवाहन केले होते. स्वत: दीप प्रज्वलित करतानाचे फोटो पोस्ट केले होते. या ट्वीटने हा विक्रम केला आहे. हे ट्वीट ट्विटरवर भारतीय राजकारणात सर्वाधिक रिट्वीट करण्यात आलेले ट्वीट (Most Retweeted Tweet by a Politician in 2020 in India) आहे. मंगळवारी ट्विटर इंडियाने ही माहिती दिली.

कोरोना काळात नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०२० मध्ये देशभरातील नागरिकांना आवाहन केलं होते की, कोरोना योद्ध्यांना (Corona Warriors) सलाम करण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी दिवे लावा. स्वत: नरेंद्र मोदी यांनी देखील दीप लावताना एक फोटो पोस्ट केला होता. ट्विटर इंडियाच्या मते हे ट्वीट भारतात रिट्वीट करण्यात आलेले पहिल्या क्रमांकाचे राजकीय ट्वीट आहे.

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनात ५ एप्रिल रोजी ९ वाजून ९ मिनिटांनी लाइट्स बंद करून लँप, पणत्या, सेलफोन फ्लॅश सुरू करण्याचं आवाहन केले होते. ट्विटरवर पीएम नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ‘शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा। शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते॥’ हा संस्कृत श्लोक लिहिला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER