सीरमच्या आगीत ५ जणांचा मृत्यू – राजेश टोपे

Rajesh Tope - Serum Institute of India Fire

पुणे :- सीरम इन्टिट्यूटमध्ये (Serum Institute) लागलेल्या आगीबाबत मी पुण्याचे (Pune) जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी सांगितले, वेल्डिंगचे काम सुरू असताना दुपारी २ वाजता आग लागली. तेथील ज्वलनशील सामानामुळे आग भडकली. या आगीत ५ जण ठार झालेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेचे पाच टँकर आणि तीन पाण्याचे टँकर तात्काळ बोलावण्यात आले होते. दोन -तीन तासात पूर्ण आग विझवण्यात आली. आग विझल्यानंतर आत पाच शव सापडले आहेत. कोव्हिशिल्ड लसीच्या उत्पादन केंद्राचे काहीही नुकसान झाले नाही. याप्रकरणी पोलीस तपासासोबत फायर ऑडिटही केले जाईल असे त्यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : सिरम इन्स्टीट्युटची आग नियंत्रणात, आरोप करणा-यांना संयमाची लस द्यावी लागेल – मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER