राजस्थानच्या चंबळ नदीत बोट उलटली; ५ जणांचा मृत्यू, १० जण बेपत्ता

Boat Drowned In Kota Rajasthan

कोटा : राजस्थानच्या (Rajasthan) बुंदीच्या चंदा खुर्दमध्ये चंबळ नदीत बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत २५ ते ३० जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ५ जणांचे मृतदेह काढण्यात यश आले आहेत, तर १० जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. राजस्थानमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली.

बोटीत क्षमतेपेक्षा अधिक लोक बसल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोठला कलाच्याजवळ कमलेश्वर धाम जात असताना ही घटना झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. १० जण बेपत्ता आहेत. या बोटीत १४ मोटरसायकलही होत्या. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. लोकसभा सचिवालयाने जिल्हा प्रशासनासोबत संपर्क साधला असून कोटा येथून एसडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER