चिनी सैनिकांकडून अरुणाचलमधील 5 जणांचे अपहरण; कॉंग्रेस आमदाराचा दावा

Ninong Erring

नवी दिल्ली : गेल्या चार महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्या सीमेवर तणावाचं वातावरण आहे. त्यातच आता कॉंग्रेसचे आमदार निनोंग ईरिंग (Congress MLA Ninong Erring) यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. चिनी सैनिकांनी (PLA) अरुणाचल प्रदेशमधल्या 5 जणांचं अपहरण केल्याचा दावा निनोंग यांनी केला आहे. एका ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी याचा खुलासा केला आहे.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) सुबासिरी जिल्ह्यात 5 जणांचं अपहरण केलं असल्याचं आमदार निनोंग ईरिंग यांनी लिहिले आहे. ‘धक्कादायक बातमी! आमच्या राज्या अरुणाचल प्रदेशातील सुबासिरी जिल्ह्यातील 5 जणांचं चिनी सैन्याने अपहरण केलं. अशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. त्यामुळे चिनी कम्युनिस्ट पक्षाला चोख प्रत्युत्तर द्यायला हवं.’ असं निनोंग यांनी ट्विटमध्ये लिहीलं आहे.

निनोंग यांनी केलेल्या दाव्यामुळे दाव्याची अद्याप कोणतेही पुष्टीकरण किंवा सविस्तर माहिती समोर आली नसून तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. चीनला योग्य ते उत्तर द्या अशी मागणी करत निनोंग यांनी पंतप्रधान कार्यालयाला (PMO) ट्विटमध्ये टॅग केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER