नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद, १० जखमी

Naxal Attack

छत्तीसगड :-  छत्तीसगडमधील (Chhattisgarh) तररेमजवळच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत (Naxal) झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद तर १० जवान जखमी झाल्याची माहिती डीजीपी डी. एम. अवस्थी यांनी दिली आहे. शहीद जवानांमध्ये डीआरजी व सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ७५ किमी अंतरावर असलेल्या सिलगेर गावाजवळील जोन्नगुडा जंगलात ही चकमक झाली. यामध्ये नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यावर जवानांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच घटनास्थळावर नक्षलवाद्यांचे काही मृतदेह आढळले आहेत. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद   तर १० जवान जखमी आहेत. जखमी जवानांना एअरफोर्सच्या हेलिकॉप्टर आणि रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button