राज्याला दिलासा; आज ४७ हजार ३७१ जण करोनामुक्त, तर ७३८ रूग्णांचा मृत्यू

Maharashtra Coronavirus

मुंबई : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत राज्याला आज मोठा दिलासा मिळाला. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार ३७१ रूग्णकोरोनातून बरे झाले, तर २९ हजार ९११ नवीन रूग्णांचे निदान झाले. याशिवाय, ७३८ रूग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५०,२६,३०८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतली आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९१.४३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८५ हजार ३५५ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२१,५४,२७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,९७,४४८ (१७.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २९,३५,४०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,८३,२५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button