४६,२५३, सेन्सेक्सचा ऐतिहासिक उच्चांक

Sensex

मुंबई : शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी ४६,२५० हा ऐतिहासिक उच्चांक गाठला. दिवसअखेर १५४ अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स ४६,२५० अंकांच्या पुढे बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४४ अंकांच्या वाढीसह विक्रमी १३,५५८ अंकांवर बंद झाला. आयसीआयसीआय बँक, एल अँड टी आणि कोटक बँकेचे शेअर्स वधारलेत.

बाजारात परकीय गुंतवणूकीचा ओघ कायम आहे. जागतिक शेअर बाजारातही चांगली स्थिती आहे. त्याचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाला. आज मुंबई शेअर बाजाराने ४६,३७३ ही ऐतिहासिक उंची गाठली होती. पण त्यानंतर काही अंकांची घट होऊन बाजार ४६,२५३ अंकांवर बंद झाला.

निफ्टी १३,५५८ अंकांवर बंद झाला असला तरी, निफ्टीनेही १३,५९७ हा उच्चांक गाठला होता. ओएनजीसीच्या शेअर्सला चांगलाचा फायदा झाला. त्यानंतर एल अँड टी, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एचसीएल टेक, टायटन आणि कोटक बँकच्या शेअर्समध्ये तेजी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER