अबब ! कोल्हापुरात ४६० कोरोना रुग्ण गायब

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) शहरात तब्बल ४६० कोरोनाबाधित ‘बेपत्ता’ (Missing) असल्याची खळबळजनक माहिती महापालिकेच्या अहवालातून समोर आली आहे. अशा बेपत्ता कोरोना रुग्णांमुळेच शहरात मोठ्या प्रमाणात सामूहिक संसर्ग पसरला असण्याची शक्यता आहे. शहरासह सर्वत्र बिनधास्त कोरोनाचा प्रसार करणाऱ्या या कोरोनाग्रस्तांवर प्रशासन कसे नियंत्रण मिळवणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनाची भीती व पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबांसह सर्वांची होणारी फरफट यामुळे अनेक जण चुकीचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता देत असल्याचा संशय यंत्रणेला आहे. यावर जिल्हा प्रशासनाबरोबरच महापालिका प्रशासनही शांत होते. परंतु, कोल्हापूर शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस फुगतच चालला आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ आकडेवारी काढण्यासाठी महापालिकेने कोरोनाचा सविस्तर अहवाल तयार केला. त्यातून शहरात कोरोनाचे टेस्ट (Corona test) केलेले पण मिळत नसलेले ४६० जण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांचा काहीच थांगपत्ता लागत नाही. गेल्या एक-दीड महिन्यांतील ही आकडेवारी आहे. त्यामुळे अशा पळून गेलेल्या कोरोनाबाधितांमुळेच शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढण्यास मदत होणार आहे.

ही बातमी पण वाचा : राज्यात ५ लाख ५४ हजार ७११ कोरोनाबाधित झाले बरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER