संजय राठोड यांचे घटनेच्या दिवशी पूजाला ४५ फोन! चित्रा वाघ यांचा दावा

Chitra Wagh - pooja chauhan - sanjay rathod

मुंबई : पूजा चव्हाणने (Pooja Chauhan) आत्महत्या केली त्या दिवशी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजाला ४५ फोन केले होते. अरुण राठोडने पोलिसांच्या १०१ या क्रमांकावरून ही कबुली दिली होती, असा दावा भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

पूजाने आत्महत्या केली त्या दिवशी १०१ क्रमांकावरून झालेले अरुण राठोडचे संभाषण जाहीर करून त्याची चौकशी करा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून पूजाचे आत्महत्याप्रकरण आक्रमकपणे लावून धरणाऱ्या चित्रा वाघ यांनी केली.

पवार-ठाकरेंकडून अपेक्षा
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात सरकारचे कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आता तरी त्यांनी या खुन्याला मंत्रिमंडळातून बाजूला करावे. आमचा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यांना पुरावे दिले तर ते नक्कीच न्याय देतील. राजकारण बाजूला ठेवा. बाकी कोणाकडूनच आमची अपेक्षा नाही. इतर चट्टेबट्टे सारखेच आहे. मुख्यमंत्री म्हणून महिलांच्या बाबतीत तुमची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यामुळे तुमच्याकडून आमच्या भरपूर अपेक्षा आहेत, असे वाघ म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER