राज्यात आज दिवसभरात ४४ हजार ४९३ रूग्ण कोरोनामुक्त

Corona Virus

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. मात्र करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत अद्यापही मोठ्यासंख्येने दरररोज भर पडत आहे. राज्यात आज दिवसभरात ४४ हजार ४९३ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ५५५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, २९ हजार ६४४ नवीन करोनाबाधित वाढले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ५०,७०,८०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९१.७४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८६ हजार ६१८ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२४,४१,७७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,२७,०९२ (१७.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,९४,४५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,९४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,६७,१२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button