अफगाणिस्तानमधे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४३ ठार

Kabul

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधे दहशतवाद्यांनी सोमवारी सरकारी कार्यालयावर केलेल्या हल्ल्यात ४३ लोकांना जण ठार झाले आहेत . या हल्याची जबाबदारी अजून तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.

सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार आत्मघाती दहशतवाद्यांनी काबुलमधील सरकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कारबॉम्बचा स्फोट घडवला. स्फोटानंतर लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले तेंव्हा पळणाऱ्या लोकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. कार्यालयाच्या बाहेर बॉम्ब स्फोट झाल्यानंतर गोळीबार सुरू झाल्याने शेकडो लोक आतच अडकून पडले.

अफगाणिस्थानचे सुरक्षा दल घटनास्थळी पोहचल्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षादलात चकमचक झाली. चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. ३५० लोकांची सुटका करण्यात आली. जखमी आणि मरण पावलेल्यांमध्ये सामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.