
कोल्हापूर :- राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने 9 वी ते 12 वीच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा आदेश दिला होता. यानुसार ग्रामीण भागातील 1054 पैकी 400 शाळा सुरु झाल्या होत्या. मात्र शहरातील एकही शाळा सुरु झाली नव्हती. शहरातील सुमारे 112 शाळा आजपासून सुरु झाल्या. 1605 शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी 1592 जणांची कोरोना (Corona) चाचणी पुर्ण झाली आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने 9 ते 12 वीच्या शाळा सोमवार पासून सुरु करण्याचा आदेश दिला होता. मात्र कोरोनाच्या धास्तीमुळे शाळा सुरु होतील की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. राज्यातील इतर जिल्ह्यांनी शाळा सुरु करण्याची तारीख 15 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलली होती. मात्र जिल्ह्यातील शाळा टप्प्याटप्याने सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी शाळा सुरु होणार की नाही याकडे पालक, विद्यार्थी व प्रशासनाचे लक्ष लागून राहिले होते. तब्बल साडे आठ महिन्यानंतर शाळांची आज घंटा वाजली. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील 112 शाळा मिळून तब्बल 42 हजार विद्यार्थ्यांनी आज शाळेत हजेरी लावली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला