कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४२ नव्या खाणी विचाराधीन

Iron Ore Mines

कोल्हापूर : सह्याद्रीच्या ४२ नव्या खाणींचे प्रस्ताव केंद्र आणि राज्य शासनाच्या विचाराधीन आहेत. गोव्यातील खाण व्यवसाय न्यायालयीन आदेशाने बंद आहे. आता येथील खाण मालकांनी आता कोल्हापूर(Kolhapur), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), सांगली (Sangli) आणि रायगड (Raigad) जिल्ह्यांत खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सिंधुदुर्गात आधीपासून म्हणजे गेल्या ५६ लोहखाणी आहेत. त्यातील ३९ बंद तर १७ चालू आहेत. कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात नव्या ४२ खाणींचे प्रस्ताव मंजूर झाल्यास दोन्ही जिल्ह्यातील पर्यावरणाला मोठी हानी पोहोचणार आहे.

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील असलेल्या या प्रदेशातील छोट्यातील छोटा मानवी हस्तक्षेपसुद्धा मोठ्या नैसर्गिक आपत्तीला कारणीभूत होऊ शकतो. संयुक्त राष्ट्र संघाच्या निसर्ग संवर्धन समितीसह पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ समितीनेही म्हटले आहे. जंगले आणि अभयारण्यांतील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात असलेली शेकडो गावे या क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून यापैकी अनेक गावांना लवकरच संवेदनशील क्षेत्रातून बंधमुक्त करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. खाण व्यावसायिक आणि बिल्डर लॉबी त्यासाठी प्रयत्नशील आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील असलेल्या या प्रदेशातील छोट्यातील छोटा मानवी हस्तक्षेपसुद्धा मोठ्या नैसर्गिक आपत्तीला कारणीभूत होऊ शकतो. संयुक्त राष्ट्र संघाच्या निसर्ग संवर्धन समितीसह पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ समितीनेही आपल्या अहवालातून तसा इशारा दिला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून सध्या या भागाची पोखरण सुरूच आहे. सध्या या भागातील जी गावे या संवेदनशील भागातून बगळण्याचा घाट आहे, सह्याद्री घाट माथ्याचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आणणारा असल्याने पर्यावरण प्रेमी चिंतेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER