डीआरआयच्या धाडसत्रात ४२ किलो सोने जप्त

42 kg of gold seized by DRI

मुंबई : डीआरआय (महसूल गुप्तचर महासंचालनालया)ने चोरटे सोने पकडण्यासाठी टाकलेल्या धाडींमध्ये एकूण ४२ किलो सोन जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत १६ कोटी ५० लाख रुपये आहे. या मोहिमेत कोलकाता, मुंबई आणि रायपूर येथे धाडी टाकण्यात आल्या. दोन दिवस धाडी टाकणे सुरु होते. या संदर्भात १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कोलकाता येथे गोविंद मालवीय आणि फिरोज मुल्ला यांच्याकडे टाकलेल्या धाडीत २६. ६५० किलो सोन जप्त करण्यात आले. या दोघांसोबत अण्णा राम, महेन्द्र कुमार, सूरज मगाबुल, कैलास जगताप, विसाल माने यांनाही अटक करण्यात आली.

अल्पवयीन मुलीची विक्री करण्याच्या प्रयत्न : लातूरच्या तिघांना सांगलीत अटक

रायपूर येथे ८ किलो व मुंबई येथे ७ किलो सोन जप्त करण्यात आले. या प्रकरणी गोपराम, मिल्नकुमार आणि साहिल जैन यांना अटक करण्यात आली.

डीआरआयने या आर्थिक वर्षात पूर्व विभागात सुमारे २१९ किलो सोनं जप्त केले आहे.