महात्मा फुले हायस्कूलचे 41 विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणत्तायादीत चमकले

41 students of Mahatma Phule High School shine in scholarship

नांदेड : आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम ठेवून यंदाही महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पूर्वउच्च माध्यमिक इयत्ता 5 वी व उच्च माध्यमिक इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण 41 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. यामध्ये पाचवीतील 17 व आठवीतील 24 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इयत्ता आठवीतील 4 विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तिडके ओंकार रामेश्वर हा राज्यातून चौथा व जिल्ह्यातून पहिला आला आहे. कदम मनेन तुकाराम हा राज्यात 11 वा, रहाटकर वैभव विनय हा राज्यातून 14 वा तर पाटील पियूष शिवाजी हा राज्यात 15 वा आला आहे.

इयत्ता 5 वी तील विद्यार्थी सायली जाधव ही शाळेतून पहिली तर जिल्ह्यातून 4थी आली आले. तसेच श्रीश क्षिरसागर, मंदार परळीकर, अभिनव तोंडे, हरीओम पवार, पार्थ बच्चेवार, आदिती दरणे, स्नेहल मुंगल, मनस्वी भूस्सो, सिध्दांत पिपंळदरे, समीक्षा क्षिरसागर, श्रीजीत कदम, ओमकार दुबेवाड, मधुरा पाटील, समृध्दी वाकोरे, अभिषेक फुले, संस्कार पुरजवार, रिया जाधव, इयत्ता 8 वी तील तिडके ओंकार, कदम मनन, रहाटकर वैभव,पाटील पियुष, बिच्चेवार, सुचिता काळे, सायली व्हनशेट्टे, प्रतिक्षा काशेटवार, शिवाणी पुरजवार, स्नेहा कामीनवार, अंजली एडके, प्रणव हिंगमिरे, संतोष जाधव, संकेत देवराये, आदित्य भोळे, सावनी पदमवार, प्रणाली कोरडे, विवेक काळबांडे, नेहा कदम, वेदांत देवसरकर, साक्षी आढाव, श्रीनिवास महिंद्रकर वैष्णवी काशेटवार, शिवाणी कोटगीरे, सिध्दी तोटेवाड, शंतनू यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, संस्थेच्या उपाध्यक्ष खा.सौ.अमिताताई चव्हाण, सचिव आ.डी.पी.सावंत, सहसचिव उदयराव निंबाळकर, खजिनदार गंगाधरराव शक्करवार, शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एस.पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.शेंदारकर, उपमुख्याध्यापक पी.आर.कानडे, पर्यवेक्षिका सौ.के.डी.देशमुख, सौ.मोरे एस.डी., दुपार सत्रातील पर्यवेक्षक एस.के.तावडे, विभाग प्रमुख व्ही.एम.शिंदे तसेच सौ.एस.एन.पेंडलवाड, विभाग प्रमुख सौ.एम.एन.कदम, कल्याणकर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.