गिधाड संवर्धनासाठी केंद्राकडून ४०६ कोटी : पंचवार्षिक कृती आराखडा

Ministry of Environment, Forest and Climate Change

मुंबई : पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या गिधाडांच्या संवर्धन आणि विकासाकरिता केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (Ministry of Environment, Forest and Climate Change) पंचवार्षिक कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार पाच संवर्धन-पैदास केंद्रांची उभारणी, व्हल्चर सेफ झोन आदी कऱण्यात उरणार आहेत. याकामांसाठी ४०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली

जगभरात गिधाडांच्या २३ प्रजाती आढळतात. पैकी भारतात बीअर्डेड व्हल्चर, सीनरस व्हल्चर, इजिप्शीअन, युरेशियन, हिमालयीन, लांग बिल्ड, रेड हेडेड, स्लेंडर बिल्ड, ओरिएंटेल व्हाईट बॅक या ९ प्रजाती आढळतात. पैकी लॉंग बिल्ड व्हल्चर, स्लेंडर बिल्ड व्हल्चर व ओरिएंटेल व्हाईट बॅक व्हल्चर या तीनच प्रजातींची गिधाडे दिसून येतात. उर्वरित ६ प्रजाती जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. मराठवाड्यातील काही भागांतच गिधाडे आढळतात. ज्यांची संख्याही अत्यल्प आहे. ८० च्या दशकापर्यंत सर्वत्र या पक्ष्यांचा अधिवास होता. ९० नंतर त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. यास वाढती विकासकामे, प्रदूषण आणि डायक्लोफिनॅक औषध (जनावरांना दिले जात होते.) ही तीन प्रमुख कारणे आहेत. तथापि, निसर्गाचा घटक, अन्नसाखळीमधील महत्त्वाचा दुवा असलेल्या गिधाडांच्या संकर्धनासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ११८ पानांचा पंचवार्षिक कृती आराखडा तयार केला आहे.

देशातील संवर्धन पैदास कार्यक्रमात वाढ करण्यात आली असून नवीन पाच केंद्रे मंजूर करण्यात आली असून एक नाशिक येथे मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित गोरखपूर, त्रिपुरा, कनार्टक, कोइंबतूर येथे तयार केली जाणार आहेत. यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. चार व्हल्चर रेस्क्यू सेंटर उभारले (पिंजोर, भोपाळ, गुवाहटी, हैदराबाद) जाणार आहेत. नॅशनल व्हल्चर रिकव्हरी कमिटी अंतर्गत या आराखड्याची अंमलबजावणी होणार आहे. याअंतर्गत राष्ट्रीय, राज्यस्तरीय समित्या स्थापन करून आराखडा संबंधित विविध यंत्रणांमार्फत राबविला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER