बाप हा बापच असतो…गडकरींच्या एका फोनवर नागपुरात 4 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची सोय

Nitin Gadkari-Remedesivir injection

नागपूर: दोन दिवसांपुर्वी नागपुरात रेमडेसिवीरचा (Remedesivir injection) प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. ही वस्तुस्थिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) कानावर पडताच त्यांनी चक्र फिरवली. ‘कोविड’वरील (Covid-19) उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी नितीन गडकरी यांनी आधी सन फर्मच्या मालकाशी बोलून नागपुरात तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिली होती. मात्र मागणी जास्त असल्याने त्यांनी मायलन/’व्हिटारिस इंडीया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

नितीनजींच्या विनंतीनंतर ‘मायलन इंडिया’नं तात्काळ चार हजार इंजेक्शन नागपुरला पोहोचती केली आहे. तसेच लवकरच दुसरी खेप पाठवण्याचे आश्वासनही दिले आहे. मायलन इंडिया ही ‘रेडेसिवीर ‘ इंजेक्शन उत्पादन करणारी भारतातील सगळ्यात मोठी कंपनी आहे .

यापुर्वी नितीन गडकरी यांनी ‘सन फार्मा’चे मालक सिंघवी यांच्याशी बोलणे केले होते. ‘सन फार्मा’मार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार डोसचा पुरवठा नागपुरात झाला आहे आणि उर्वरित डोसेज लवकरच पोहोचवण्याची अपेक्षा आहे. दरम्यान कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊन डॉक्टरांना सहकार्य करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button