बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी तब्बल 400 कोटी मंजूर

Balasaheb Thackeray's memorial

मुंबई :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरात हे स्मारक होणार आहे. आज (1 मार्च) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने या निधीस मान्यता दिली. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) होते.

बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम एकूण दोन टप्प्यांत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामं केली जातील. या सर्व कामांसाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे 250 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

मुंबई महापौर यांच्या निवसास्थानाच्या परिसरात होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आज 400 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER