सातारा-देवळाई भागासाठी ४०० कोटींचा निधि द्यावा : अंबादास दानवे

Ambadas Danve

औरंगाबाद : शहरातील सातारा, देवळाई भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी या भागातील नागरिक निवेदने देऊन मागणी करत असतात, या भागामध्ये नागरिकाची मोठी वसाहत असल्यामुळे या भागामध्ये विकास कामे करणे गरजेचे आहे.

सातारा, देवळाई गावांची काही वर्षांपूर्वी नगर परिषद स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांनी मनपामध्ये सामाविष्ट होणे पसंत केले होते. मनपाच्या आधिपत्याखाली हा भाग गेला आहे नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास मनपा समर्थ ठरत आहे, या भागामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी रस्ते, पाणी, भूमीगत गटार, पथदिवे आदी सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सातारा देवळाई भागामध्ये ऐतिहासिक खंडोबा मंदिर असून या ठिकाणी दर्शनासाठी शहरातील व बाहेरील नागरिक येत असतात.

या सर्व परिस्थितिचा आढावा घेऊन आमदार अंबादास दानवे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा देवळाई या संदर्भात सातारा, देवळाईच्या विकासाठी ४०० कोटी रूपये निधीची मागणी केली. त्यात प्रामुख्याने जलनीरसन वाहिन्या, रस्ते अशा विविध कामांसाठी निधि उपलब्ध करून देण्यात यावे जेणे करून शहरात ही विकासकामे झाली तर नागरिकाची गैरसोय होणार नाही. यामुळे शहराच्या विकासामध्ये भर पडेल. अर्थ संकल्पीय अधिवेशनात आमदार दानवे यांनी लक्ष वेधुन धरले.

यावेळी आमदार दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यानी सांगितले की, सातारा देवळाईसाठी लवकरात लवकर बैठक घेऊन विकासकामासाठी निधि देण्याविषयी निर्णय घेण्यात येईल.