देशात ४० लाख टन जादा साखरेचे उत्पादन

नवी दिल्ली : यंदाचा ऊस गळीत हंगाम संपण्यास अजून सरासरी दीड महिने असतानाच तुलनेत ३९ लाख ८८ हजार मेट्रीक टन जादा साखरेचे उत्पादन झाले आहे. १५ फेब्रुवारीला मागील वर्षी १७०.०१ तर यंदा २०९.८९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या हंगामात देशपातळीवर ३०० लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. सुरूवातीचा १३० लाख टन शिल्लक साखरेचा विचार करता देशपातळीवर साखरेची उपलब्धता (sugar produced) ४३० लाख टन इतकी प्रचंड असेल. साखर उद्योगापुढे शिल्लक साखरेचे मोठे आव्हान असणार आहे.

महाराष्ट्रात १८३ कारखान्यांनी ७५.४६ लाख टन साखर उत्पादीत झाली. मागील वर्षी यादरम्यान १४० कारखान्यांनी ४३.३८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. उत्तरप्रदेशात ११६ कारखान्यांकडून मागील वर्षी ६५.१३ तर यंदाच्या वर्षी ६६.३४ लाख टन तर कर्नाटकात ६६ कारखान्यांनी यंदा ३९.०७ तर मागील वर्षी ३०.८० लाख टन साखर उत्पादीत केली होती. गुजरातमध्ये १५ कारखान्यांनी ६.५५ तर मागील वर्षी ५.९५ साखरचे उत्पादन केले होते. तामिळनाडूत २.६३ लाख टन तर आंध्रप्रदेश, तेलंगाणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि ओडीसा या राज्यात २० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

आतापर्यंत मागील वर्षीच्या धोरणानुसार तीन तर नव्या धोरणानुसार चार लाख टन साखरेचे निर्यात झाली आहे. ३१ डिसेंबर २०२०पासून नवे निर्यात धोरण ठरल्यापासून २५ लाख टन साखर निर्यातीचा करार इंडोनेशियासोबत झाला आहे. लवकरच इराणसोबत नवा करार होण्याची शक्यता आहे. ६० लाख टन साखर निर्यात करण्याचे केंद्राचे धोरण आहे.

हंगामाच्या सुरुवातीलाच पुढील सहा महिने पुरेल इतका साखर साठा आहे. नवीन उत्पादीत केलेली साखर विक्रीसाठी मार्च २०२१ उजाडणार आहे. तेथून पुढे तयार होणारी साखर पुढील सोळा महिने विकावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER