
नवी दिल्ली :- सध्या देशात महामार्ग (Highway) उभारण्याचे काम अतिशय वेगात आहे. या वर्षात आतापर्यंत ११ हजार ०३५ किलोमीटर महामार्गाची उभारणी झाली आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसाला ३३ किलोमीटर महामार्ग उभारले जातात.
भविष्यात या कामाचा वेग आणखी वाढणार आहे. ३१ मार्पर्यंत प्रत्येक दिवसाला ४० किलोमीटर महामार्गाची उभारणी होणार. असे महामार्ग मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले. या आर्थिक वर्षात बराच काळ लॉकडाउन आहे. महामार्ग निर्मितीच्या कामावर कसलाही परिणाम झाला नाही. या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.
जेव्हा आपण महामार्ग मंत्री म्हणून काम सुरू केले, त्यावेळी दिवसाला फक्त दोन किलोमीटर महामार्ग उभारले जात होते. ४०६ प्रकल्प रखडले होते. त्यामध्ये ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अडकली होती. मात्र, आता अतिशय कार्यक्षमरित्या कामाची सुरुवात केली आहे. त्यामुळे बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता ३ लाख कोटी रुपयांनी कमी झाल्याचे गडकरी यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला