चार वर्षांच्या एस्टर हॅन्मेटेने गायले ‘वंदे मातरम्’; मोदी म्हणाले, तुझ्यावर गर्व आहे!

PM Narendra Modi - Esther Hnamte

नवी दिल्ली : मणिपूरमधील (Manipur) एस्टर हॅन्मेटे या चार वर्षांच्या बालिकेने ‘वंदे मातरम्’ गीत पूर्ण गायले. तिचा व्हिडीओ मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी ट्विटर अकाउंटवर शेअर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये तिचे कौतुक केले आहे.

ट्विटमध्ये मोदी म्हणाले, एस्टर हॅन्मेटे आम्हाला तुझ्यावर गर्व आहे. अतिशय उत्तम सादरीकरण केले आहेस. एस्टरच्या व्हिडीओला ३३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. एस्टरच्या यू-ट्यूब चॅनलवर ७३ हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झाले आहेत. एस्टर ही मिझोरमच्या लुंगलेईची रहिवासी आहे. ए. आर. रहमान यांचे ‘माँ तुझे सलाम… वंदे मातरम्’ हे गीत तिने गायले आहे. ए. आर. रहमान यांनीही तिचा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

एस्टर हॅन्मेटेने हातात तिरंगा घेऊन ‘वंदे मातरम्’ म्हटले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER