रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४ हजार १६ मे. टन खत उपलब्ध

Farmer - Fertilizer

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ४ हजार १६ मेट्रिक टन खत आर.सी.एफ. कंपनीतर्फे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ऐन शेतीच्या हंगामात जिल्ह्यात खताची टंचाई निर्माण झाली होती. अखेर हे खत सोमवारी उपलब्ध झाले आहे. सोमवारी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेक पॉइंटवर २६८७ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. यामध्ये १२५९ टन युरिया १४२८ टन सुफला असे २६८७ टन इतके खत आले. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी १३२९ युरिया थळ अलिबाग येथून आरसीएफ कंपनीकडून उपलब्ध झाले आहे. असे सर्व मिळून ४,०१६ मेट्रिक टन खत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER