एसटी महामंडळाच्या २ हजार नवीन बसेससाठी ६०० कोटींचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर – ॲड. अनिल परब

मुंबई : गाव ते जिल्हा अशा 60 कि.मी.च्या अंतरात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी 90 टक्के प्रवासी या अंतरात प्रवास करतात. ही सेवा वाढविण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये परिवहन विभागाने 2 हजार साध्या परिवर्तन (लालपरी) बसेस खरेदी करण्यासाठी रु. 600 कोटीचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून – संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब

श्री. परब म्हणाले, एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करुन वित्त विभागाला पाठविण्यात आला आहे. मागील वर्षी शासनाने 700 साध्या बसेस (500 लालपरी, 200 विठाई) बसेस खरेदी करण्यासाठी महामंडळाला निधी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार महामंडळाने रु. 186 कोटीची मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी शासनाने रु. 110 कोटी एसटी महामंडळास दिले आहेत. या 700 बसेस नुकत्याच दाखल झाल्या आहेत.