बाळासाहेब ठाकरेंच्या सोलापुरातील स्मारकासाठी ४ कोटी देऊ – एकनाथ शिंदे

4 crore for Balasaheb Thackeray's memorial in Solapur - Eknath Shinde

सोलापूर : सोलापुरच्या पूर्वभागात होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारकासाठी ४ कोटी रूपये लवकरच देऊ, अशी घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. एकनाथ शिंदे शनिवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यांनी नियोजन भवनात महापालिकेच्या विकास कामांसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी स्मारकाच्या निधीची घोषणा केली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापालिकेत ठराव मंजूर झाला आहे. पण महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने स्मारक उभा राहण्यासाठी अडचण येत असल्याची कैफियत सोलापुरातील नगरसेवकांनी आजच्या बैठकीत मांडली. याची दखल घेत स्मारकाचे काम मार्गी लागण्यासाठी तातडीने ४ कोटी रूपयांचा निधी देण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER