गेल्या सात वर्षांत ४ कोटी ३९ लाख बोगस रेशन कार्ड रद्द

Fake Ration Card

नवी दिल्ली :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत (एनएफएसए) अन्न व सार्वजनिक वितरण विभाग अंतर्गत योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा या उद्देशाने गेल्या सात वर्षांत  राज्य, केंद्रशासित प्रदेशांकडून तब्बल ४ कोटी ३९ लाख बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत.

गरजूंना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी तंत्रज्ञान आधारित सुधारणांचा भाग सार्वजनिक वितरण म्हणून देशभरात प्रणालीचे (टीपीडीएस) आधुनिकीकरण करण्यासह रेशन कार्ड, लाभार्थ्यांची माहिती, आधार सीडिंग, अपात्र, बोगस रेशन कार्ड शोधून पारदर्शकता व कार्यक्षमता सुधारण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने दिली.

देशात ८१ कोटी ३५ लाख नागरिकांना टीपीडीएसद्वारे अनुदानित धान्य उपलब्ध करवून देण्यात येते. २०११ च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येनुसार हे प्रमाण जवळपास दोन तृतीयांश आहे. सध्या देशातील ८० कोटींपेक्षा जास्त लोकांना तांदूळ, गहू, भरड धान्य देण्यात येत आहे. महिन्याकाठी प्रत्येकी ३, २ तसेच १ रुपये दराने तांदूळ, गहू आणि भरड धान्य गरजूंना एनएफएसए अंतर्गत उपलब्ध करवून देण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.

ही बातमी पण वाचा : महापालिका पथकाकडून दिवसात 64 हजारावर दंड वसूल : आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER