सांगली जिल्ह्यात बुधवारी चार जण कोरोनाबाधित – जिल्हाधिकारी डॉ. चौधरी

4 corona positive in Sangli on Wednesday- Chaudhary

सांगली : सुलतानगादे तालुका खानापूर येथील 57 वर्षीय महिला दिनांक 22 मे रोजी मुंबईहून आल्या होत्या तसेच करनगुली तालुका शिराळा येथील 33 वर्षीय पुरुष दिनांक 17 मे रोजी मुंबईहून आला होता, तर आंबेगाव तालुका कडेगाव येथील 36 वर्षीय पुरुष दिनांक 24 मे रोजी मुंबईहून आला होता या तिघांना कोरोणाची लागण झाली असून त्यांच्यावर मिरज येथे आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत.

तर लांडगेवाडी तालुका कवठेमहांकाळ येथील आठ वर्षीय मुलगी ही दिनांक 23 मे रोजी मुंबईहून आल्याने कम्युनिटी क्वारंटाईण मध्येच होती तिला ही कोरोणाची लागण झाली आहे. या सर्वांवर मिरज सिव्हिल येथील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. सुलतानगादे , करंगुली व आंबेगाव येथे कंटेनमेंट झोनची कार्यवाही तसेच अन्य प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे . अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER