गणेश नाईकांच्या गडाला खिंडार; चार नगरसेवक गेले शिवसेनेत

Ganesh Naik

मुंबई :– नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. ज्या भाजपच्या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला होता ते आता शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हे चारही नगरसेवक शिवबंधन बांधणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकार विश्वासघातकी : आमदार राणाजगजितसिंह पाटील

चारही नगरसेवकांनी राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतल्या सर्व नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवी मुंबई महापालिकेत गेली अनेक वर्षे ही राष्ट्रवादीची सत्ता आहे . नाईक हे आपल्या सर्वच नगरसेवकांसह भाजपमध्ये आल्याने मूळ भाजपच्या असलेल्या नगरसेवकांमध्ये असंतोषाची भावना आहे. आपल्याला डावललं जातेय अशी त्यांची भावना असून त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.