सांगलीतील तरुणाला बेदम मारहाण करणार्‍या चौघांना अटक

arrested

सांगली : शहरातील कॉलेज कॉर्नरनजिकच्या पानपट्टीच्या बाजूला आकाश वडर याला पाईपने बेदम मारहाण करणार्‍या चौघांना विश्रामबाग पोलीसांनी अटक केली. विकी राजू मुळके (वय 21), पवन सुरेश पवार (वय 20), लक्ष्मण सुनकाप्पा देवर्षी (वय 20), राहुल रमेश देवर्षी ( वय 19, सर्वजण रा. माकडवाले ) आदींचा यामध्ये समावेश आहे.

किरकोळ कारणावरुन वाद घालून चौघांनी मंगळवारी आकाश लक्ष्मण वडर (वय 23, रा. सर्वोदय चौक, वडर ) या तरुणाला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. काल त्या चौघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग पोलीसांनी दिली.