एमपीएससी परीक्षार्थी ३९८ मराठा उमेदवार १८ वर्षे नोकरीच्या प्रतीक्षेत ; मुख्यमंत्र्यांना करण्यात आली ‘ही’ विनंती

MPSC-CM Uddhav Thackeray.jpg

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अठरा वर्षापूर्वी घेतलेल्या परीक्षेतील 398 मराठी उमेदवार आजही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. उत्तर पत्रिका बदलल्याचा ठपका ठेवत एमपीएससीने नियमबाह्य पद्धतीने डावलल्यामुळे अन्याय झालेल्या या उमदेवारानी आम्हाला कोणतीही आर्थिक नुकसान भरपाई नको, फक्त न्याय द्या, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) याच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1999 मध्ये पोलीस उपनिरिक्षक, विक्रीकर निरिक्षक, मंगलय सहाय्यक पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल तब्बल चार वर्षानी में 2002 मध्ये जाहीर करण्यात आला. परंतु 398 उमेदवाराचा निकाल कोणतेही कारण न देता राखून ठेवण्यात आला. काही दिवसांनी उत्तर पत्रिका बदलल्याचा ठपका ठेवत या उमेवाराना काळ्या यादीत टाकण्यात आले एमपीएससीकडून झालेला हा अन्याय दूर करून आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे योगेश सव्यालावे यानी केली आहे या निर्णयामुळे सरकारला कोणत्याही आर्थिक संकटाला सामोरे जाऊ लागू नये याकरिता, आम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक भरपाई नको, अस हमीपत्र सर्व उमेदवारातर्फे देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER