३९६ कोटी : केंद्राकडून महाराष्ट्राला मिळाला सर्वांत जास्त निधी; फडणवीसांनी दिली आकडेवारी

Devendra Fadnavis

मुंबई :- मोदी सरकारने (PM Modi) जाहीर केलेल्या २२०० कोटींच्या निधीपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक ३९६ कोटी (396 crore) मिळाले, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्या भागाला किती निधी मिळाला त्याची यादीच त्यांनी ट्विट केली आहे. देशातल्या १५ राज्यांमधील शहरांमध्ये हवेचा दर्जा सुधारला आहे. हा निकष लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्यांना हा निधी दिला आहे.

दिलेल्या निधीचा तपशील :
औरंगाबाद – १६ कोटी
मुंबई -२४४ कोटी
नागपूर- ३३ कोटी
नाशिक- २०.५ कोटी
पुणे- ६७ कोटी
वसई आणि विरार- १६ कोटी

महाराष्ट्रातल्या औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, वसई विरार या शहरांचा यामध्ये समावेश आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी काल देशातील १५ राज्यांना हवेचा दर्जा सुधारल्याने २२०० कोटींचा निधी जाहीर केला. या राज्यांमध्ये आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER